चला! निदान हे तरी मला आठवते आहे. सकाळची शाळा असल्याने रोज ऐकायला मिळायचे. तसेच 'घटना, माहिती व संगीतावर आधारित सुप्रभात' की असा काही एक कार्यक्रम. हे कार्यक्रम (प्रवाचकः बदलून) अजूनही येतात. तसेच पुस्तकांचे. घरी गेल्यावर लहानपणीची पुस्तके पुन्हा वाचता येतात. त्यामुळे या गोष्टी जुन्या झाल्यात असे लक्षात येत नाही.

लहानपणी घरी दू.द.संच नव्हता. तो आल्यावर वर्षभरात इतर वाहिन्याही आल्या. त्यामुळे टीव्ही म्हटले की मला आ वासून पाहिलेले डिस्कवरीवरील कार्यक्रमच थेट आठवतात.