खरेच 'बावाजी' शब्द बऱ्याच दिवसात ऐकला नाही. विदर्भात 'परतलो' म्हणत नाहीत. ऐवजी 'वापस आलो' म्हणतील. 'फटाके लावने', 'येल पाडने', 'गनित जमवने',  ''भोपंजी', 'बह्याड', 'लल्लाऱ्या', 'लटाऱ्या' सारखे वाक्प्रयोग, शब्द सध्या 'मिस' करतो आहे. तसेच अमरावतीत लहान मुलाला 'बाल्या' आणि मुलीला 'बाले' म्हणतात. 'का गं बाले' फार गोड वाटते. अमरावतीत 'भल्ला', 'ओ', 'म्याट'(मॅड), 'लेका', 'बटे', 'राजा' ह्या शब्दांची वाक्यांत पखरण असते.