आखातात युद्धे झालीकी आम्ही विमान बोटी घेउन धावतो ; हे असूद्या ज्यांची आखातात धार्मिक नाळ आहे त्यांना दर्शन यात्रे साठी खास सुविधा उपलबद्ध करतोच (यांच्या सुविधांना विरोध असा इथे उद्देश नाही)]आखातात अनेक भारतीय राहतात. त्यांचे नागरिकत्व भारतीय आहे आणि त्यात एका विशिष्ट धर्माचे लोक नाहीत. (मी स्वतः आखातात राहिलेले आहे आणि येथील इतर मनोगतीही आखातात असल्याने हा प्रश्न एका धर्माशी संबंधित नाही.) हे लोक पेट्रो डॉलर्स पुन्हा देशात पाठवतात, उदा. केरळ. याशिवाय आखाताशी आपले राजकीय आणि व्यापारीसंबंध आहेत. तेलामुळे भारतच नाही तर इतर देशही आखातात 'खुट्ट' झालं की हवालदिल होतात ही वस्तुस्थिती आहे. त्यातून त्यांना आणि पर्यायाने भारतालाच मदत होते.
राहता राहिली दर्शन यात्रेची सुविधा तर ती ही आपल्याच देशांतील नागरिकांसाठी किंवा त्यांच्या धर्महितासाठी होते. यांत मतांचे राजकारण असेलच परंतु त्याचा फायदा भारत सरकारलाच होतो आणि शेवटी फायद्यावर डोळा ठेवूनच राजकारण खेळले जाते हे सत्य नाकारावे कसे? यात मला काहीही वावगे वाटत नाही. तेव्हा आखती देशाचे उदाहरण फारसे सयुक्तिक नाही.
उदाहरण घ्यायचे झाले तर मॉरिशस किंवा इस्त्राईलचे घेऊ. मॉरिशसमधील मराठी माणसांनी आपली संस्कृती, नावे, भाषा जपली. भारताशी सांस्कृतिक देवाणघेवाण कायम ठेवली. 'शीलाबाय बापूं'सारख्या व्यक्तींनी आपले भारतीयत्व व मराठी बाणा जपला. हेच इस्त्राईलमधील मराठी माणसांबद्दल त्यांची वृत्तपत्रे, मासिके, सांस्कृतिक जगाशी देवाणघेवाण यावरून म्हणता येईल.
रोमांच्या बाबतीत हे का घडले नाही याची कारणमीमांसा वर दिलेली आहेच तेव्हा पुन्हा देत नाही. अर्थात हा दोष कोणाचाही नाही.
केवळ आम्ही भारतीय वंशाचे आहोत म्हणून नाळ टिकून राहत नसते तर त्यासाठी उभय बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत आणि यासाठी आपल्या सरकारने कोणत्या कारणाने किंवा कोणत्या फायद्यासाठी उत्सुकता दाखवावी याबाबत मी साशंक आहे. उलटपक्षी रोमा लोकांनी आपली तुटलेली नाळ जोडण्याचा प्रयत्न केला तर ते समजण्यासारखे आहे. परंतु यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी.
चू. भू. दे. घे.