दुरदर्शनशी तर अतूट नातेच आहे माझे. कारण अजूनही आमच्याघरी केबल नामक प्रकार घेतलेला नाही.
पण आता तसे दर्जेदार कार्यक्रम नाहीत.
सुखदा, मला पण ती ७ च्या बातम्यांची धून आठवली की त्याच्याबरोबर आईने लावलेल्या कुकरची शिट्टी आठवते... तो वरणभाताचा वास आठवतो.
पूर्वी संतवाणी नावाचे १-२ मिनिटांचे अभंग लागायचे बहुतेक दोन कार्यक्रमांमध्ये किंवा संध्याकाळी ५.३० वाजता..