मृदुला आणि साती यांच्याशी सहमत. नुकताच अरूण साधूंचा 'ग्लोबल मराठी' वर लेख इथेच वाचला होता त्याची आठवण झाली.  मनोगतावर आल्यापासून माझे मराठी बरेच सुधारले. आधी धन्यवादही कृत्रीम वाटत असे. इथे आल्यावर परत मराठी लिहायला, वाचायला मजा आली.
मला वाटतं भाषेतील बदल हे कारण नसून परिणाम आहेत. त्यामुळे हे चूक आहे असे वाटत नाही. परिस्थिती बदलते आहे, त्याबरोबर भाषाही. साहेबालाही आपण बरेच शब्द दिले/देत आहोत.
हॅम्लेट