रावसाहेबांचा लेख आवडला आणि पटला पण. न्यूनगंड पाहून उद्विग्न होयला होते. मृदालांचे म्हणणेपण बऱ्याच अर्थी मान्य की शुभेच्छा देण्याची प्रथा पाश्चात्य.
एक साधा विचार करा की आपण किती वेळेस मराठी व्यक्तिशी फोन करताना "हॅलो" च्या ऐवजी "नमस्कार" म्हणतो? मुद्दामून (मराठीचा आभिमान वगैरे म्हणून) नाही पण काही मित्रमंडळींचे ऐकून सवय झाली. सुरवातीला कठीण वाटायचे पण आता जमते. तरी १००% "नमस्कार" म्हणत नाही, पण तशी सुरवात केल्यास बरे वाटते एव्हढे नक्की. तेच इतर भारतीयांशी बोलताना "नमस्ते" म्हणले तर वाटते आणि तसे बोलतोही.
मला तर एकदा बॉस्ट्न विमानतळावर एक मजेदार अनुभव आला. मी भारतातून आलो होतो. एक गोरा कस्टम अधिकारी उभा होता. तो मला (नेहेमिचे) प्रश्न विचारणार म्हणून मी अपेक्षेने उभा होतो. तर हा मला हात जोडून म्हणाला, "नमस्ते वेलकम होम"! कधी कधी ग्रोसरी स्टोअर्समधे पण हा "अ-भारतीयां"कडून अनुभव आला होता.
आपण जर आपले काही चांगले रिवाज सहज पाळले तर ते इतरांनापण "हॅलो" सारखेच अंगवळणी पडू शकतात. इथे कुणाला "बाटवायचा" प्रश्न अथवा इच्छा नाही पण आपल्या गोष्टी सहज समजल्या तर काय वाईट आहे?