केवळ आम्ही भारतीय वंशाचे आहोत म्हणून नाळ टिकून राहत नसते तर त्यासाठी उभय बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत आणि यासाठी आपल्या सरकारने कोणत्या कारणाने किंवा कोणत्या फायद्यासाठी उत्सुकता दाखवावी याबाबत मी साशंक आहे. उलटपक्षी रोमा लोकांनी आपली तुटलेली नाळ जोडण्याचा प्रयत्न केला तर ते समजण्यासारखे आहे. परंतु यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी.
रोमा लोकांना भारतीयांशी 'नाळ' जोडायची किंचितमात्रही इच्छा नाही. ते गेल्या अनेक शतकांप्रमाणे आपले जीवन जगत आहेत. आता ते युरोपमधील 'मेनस्ट्रीम' समुदायात मिसळूही लागले आहेत. इतकेच नव्हे तर आपला हिंदू-सदृश धर्म सोडून तरुण पिढी आता ख्रिस्ती धर्म अंगिकारू लागली आहे. खरे तर रोमांपैकी जुन्या पिढीला याची काळजी वाटत आहे. त्यांना वाटत आहे की पाच-दहा पिढ्यांमध्ये रोमांची स्वतःची ओळख नाहीशी होइल व शेकडो(हजारो?) वर्षे टिकवून धरलेली ही संस्कृती नष्ट होइल.
आपल्याला त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचे असतील तर आपण प्रयत्न करावे (किमान आपण प्रयत्न करायला पाहिजेत असे म्हणावे तरी.) "त्यांना गरज असली तर ते कृती करतील" या आढ्यतेपायी हिंदूंनी अनेक समुदाय बौद्ध, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मांत घालवले आहेत. सरकार म्हणजे कोण हो? तुम्ही-आम्हीच. जबाबदारी परस्पर तिसऱ्यावर झटकण्यात हशील नाही. हे तुम्हाला सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास होत असेल तर क्षमस्व पण माझे मत हेच आहे.
रोमा त्यांच्या दुनियेत वावरतात. त्यांना इतिहासापलिकडे भारताशी/भारतीयांशी काही घेणे-देणे नाही. आपल्याला आपुलकी वाटत असेल तर आपण प्रयत्न करावे नसेल वाटत तर सोडून द्यावे. उगाच अमक्याने हे केले पाहिजे अन् तमक्याने ते केले पाहिजे ही मल्लीनाथी कशाला?
असो, म्हणले तसे आपला अपमान झाला असल्यास क्षमस्व.
क. लो. अ.
अभय नातू
ता. क. गूगलवर 'रोमांचा इतिहास'असे शोधल्यास विषयपुरस्सर भरपूर रंजक माहिती मिळेल