गझल छान. काही विरोधाभास छान फुलारले आहेत. जीजिंशी सहमत.
माझ्या सुचवण्या.
तू तुझे वादे वसंता पाळले होते
हात माझे मोगर्याने जाळले होते!
भेटणे झाले कसे ते सांत्वनासाठी!
तू अबोलीच्या फुलांना माळले होते!
ते कसे गोंजारणे होते गुलाबाचे?
पाकळ्यांनी अंग हे रक्ताळले होते!