प्रिय जी जि अभिप्रायाबद्दल धन्यवाद,

क्ष:- क्ष हा शब्द व्यंजनांमध्ये वेगळा घेतला आहे, तो क्श असा उच्चारला जात असला तरी तो तसा लिहिला जात नाही. तसेच तो क्श असा लिहिला तरी त्याला गुरू मोजण्याचा प्रश्नच येत नाही.

क्ष क्षा क्षि क्षी क्षु क्षू क्षे क्षै क्षो क्षौ क्षं क्ष:

यापैकी क्षा क्षी क्षू क्षे क्षै क्षो क्षौ क्षं क्ष: हे गुरू मानावे. फक्त क्ष आणि क्षि हे लघु आहेत!

अक्षता: उदाहरण म्हणून घेतलेल्या शब्दात अ हा गुरू झाला कारण क्श असा पुढच्या शब्दाचा उच्चार असल्यामुळे अ वर बोलताना दाब पडतो... पण क्ष लघुच राहतो

स्वप्न: इथेही स्व हा मुळात जोडाक्षर असल्यामुळे गुरू झालेला नाही तर तो प्न या जोडाक्षरामुळे दीर्घ उच्चारला जातो... पण प्न हा लघुच आहे!

त्या क्ष च्या खुलाशासाठी आपण एकदा भुजंगप्रयातातले मनाचे श्लोक वाचावेत.

मना सज्जना भक्तिपंथेशी जावे

इथे लगागा लगागा लगागा लगागा आलंच पाहिजे कारण हा भुजंगप्रयात आहे.

मग तुमच्या जोडाक्षराच्या नियमाने ज्ज गुरू होईल आणि स लघू पण हे अगदी उलट आहे... जोडाक्षरामुळे स गुरू होतो आणि ज्ज मुळातच आ किंवा ई किंवा ऊ या स्वरांशी जोडला गेला नसल्यामुळे लघुच आहे. तसंच क्ति चं!!!

मला वाटतं एवढा खुलासा पुरे असावा तुमची गल्लत निदर्शनास आणायला...

आता मक्त्याचा अर्थ मला असा अभिप्रेत आहे...

शापितागत जन्मलो, जगलो असा येथे
पारिजाताने मला सांभाळले होते...!

पारिजाताचे झाड स्वर्गातही आढळते... (स्वर्गात फक्त तीन झाडे आहेत अशी आख्यायिका वाचली असावीत, त्यापैकी एक पारिजात) आणि त्या शेरातला नायकही तिथलाच (गंधर्व?!) त्यामुळेच पारिजाताने त्याला सांभाळले होते, पण तरी इहलोकातल्या फुलझाडांनी त्याला कधीच चांगली वागणूक दिलीच नाही, जरी पारिजात त्याच्या पाठीशी होता...