संजोपराव, चित्रपटामागची कथा सविस्तर सांगितल्याबदल धन्यवाद.

खरे आहे, हा सगळा आठवणी ताज्या करण्याचाच खेळ आहे.
अशीच आठवण आली व लिहिल्याशिवाय राहवलं नाही म्हणून लिहिलं.
पण अगदी खरं सांगायचं तर या विषयावर लिहिण्याची जरा जास्तच हिम्मत मी केली असे आता वाटू लागले आहे. (आमच्या कोल्लापुरी भाषेत बोलायचं तर "घास नाही" म्हणून ग ऽ प बसायला पाहिजे होते - इतर कुणाला नाही तरी संजोपरावांना हे बरोब्बर समजेल).
रेणुजी काय, तो चित्रपट (बासुदा, राज कपूर, शैलेन्द्र, वहीदा, सगळे धरून) काय आणि संजोपरावांची लेखणी काय, सगळ्यांचे सामर्थ्य माझ्या आवाक्याच्या कितीतरी पलीकडचे आहे.
एकच मुद्दा पुन्हा अधोरेखित करतो (हेही एक धाडसच!) -
समजा हा चित्रपट झालाच नसता तरी रेणुंची कथा तो संपूर्ण अनुभव देण्याएवढी समर्थ होती आणि आहे.

संजोप, आता तुम्हीच ती कथा मुळातून वाचा आणि तिच्यावर आणखी एक, यापेक्षा दसपट सुंदर, लेख लिहा. तुमचाच "घास आहे" तेवढा.
दिगम्भा