मी त्यांची २ का ३ भाषणे शाळेत असताना ऐकल्याचे आठवते. सगळ्या गोष्टी पटणे शक्य नाही पण एक नक्की के ते काही बुवाबाजी अथवा भोंदूगिरी करत नव्हते. किंबहूना ते हिंदूत्ववादी असल्याने देव या संकल्पनेवर अमूर्तपद्धतीने विश्वास होता. त्यांची दोन अवांतर वाचनाची पुस्तके म्हणजे : (१) वास्तव रामायण आणि (२) स्वयंभू.
आत्ता माझ्याकडचे रात्रीचे साडेबारा वाजत आले आहेत आणि निवड्णूकांचे निकाल (बुशबाबांचा निकालच लागतोय असे दिसतयं!) बघत जागत असल्यामुळे वरील दोन पुस्तकातील काही आवडलेले आणि काही करमणूक करेल असे उद्या लिहीन!