प्रिय चित्त धन्यवाद,

माझ्या सुचवण्या.
तू तुझे वादे वसंता पाळले होते
हात माझे मोगर्‍याने जाळले होते!
इथे माझा रोष फुलांवर आहे ऋतूंवर नाही. फुलेच बेइमान झाली तर वसंत असला काय किंवा ग्रीष्म असला काय तितकासा फरक पडत नाही!

भेटणे झाले कसे ते सांत्वनासाठी!
तू अबोलीच्या फुलांना माळले होते!
मूळ शेरात जो बोलण्याचा आणि अबोलीचा विरोधाभास आहे तो इथे पटकन समोर येत नाही... माळणे हा काफ़िया वापरून पाहायचा मी पण प्रयत्न केला होता, पण कवटाळणे जास्त चपखल वाटला.


ते कसे गोंजारणे होते गुलाबाचे?
पाकळ्यांनी अंग हे रक्ताळले होते!

पाकळ्यांनी नाही अंग काट्यांनीच रक्ताळले आहे, आणि मुद्दाम अशाचप्रकारे जाणून बुजून गुलाबाने माझं नातं काट्यांशी जोडून दिलं. असं अभिप्रेत आहे!

चुकत असल्यास कळवावे...

आपला
सारंग