छायाताई,
पंचलाइट या कथेची आठवण मलाही होती, या लेखात फ़िट करणे जमले नाही इतकंच.

ही कथा न वाचलेल्यांसाठी सारांश -
पंचलाइट म्हणजे मराठीत गॅसची बत्ती.
लहानसा प्रसंग आहे. गावात उनाड समजला जाणारा एक युवक असतो. तो म्हणे "हम तुमसे मुहब्बत करते सनम" असे "सलीमा" [सिनेमा] चे गाणे सारखे म्हणत असतो - म्हणून बड्याबूढ्यांच्या मते वाया गेलेला.
गावचा कुठला तरी एकत्र येऊन साजरा करण्याचा प्रसंग आहे. सगळं गाव जमलंयसुद्धा. एकच अडचण म्हणजे गॅसबत्ती पेटत नाहीये. म्हणजे ती कशी पेटवायची यातला माहीतगार तिथे नाही. गावातले मोठमोठे, प्रतिष्ठित लोक प्रयत्नांची शर्थ करतात, डोकी खाजवतात, पण व्यर्थ. आणि गॅसबत्तीशिवाय सगळाच अंधार, कार्यक्रम पुढे सरकूच शकत नाही. काय करायचे - सर्व लोक हतबुद्ध.
शेवटी चान्स मिळतो आणि हा वाया गेलेला मुलगा पुढे होऊन ती बत्ती लावून देतो व एका क्षणात गावाचा हीरो बनतो.
गावातले बडे-बूढे प्रसन्न होऊन म्हणतात (जणू आशीर्वाद देतात) - "अब ख़ूब गाओ सलीमा का गाना!"

कथा गंभीर नाही, पण मजा येते वाचताना.
दिगम्भा