इस्कहार (ते रत्न?), इस्किलार व इस्किलाड या तिन्हीचा अर्थ वेगवेगळा होतो इतकंच आठवतंय आता. इस्किलाड म्हणजे हिजड्यांचा खेळ असावा.

मी ज्या (माझ्या/आमच्या) वाचनप्रवासाचे - जी ए -> नेमाडे -> मनोहर - वर्णन केले, त्यातून मला असे म्हणायचे होते की आम्ही लोक (१९७५ सालाच्या आसपासचे वाचक) एकूण नियतिवादापासून वहात वहात अस्तित्ववाद/निरर्थकतावाद (ऍब्सर्डिझम) या दिशेने गेलो व जीवनात काहीही करणे हेच निरर्थक वाटू लागले, केवळ काय होते ते बघत राहणे, केवळ टाइमपास करत जगत राहणे हेच जीवनाचे सत्य अशी धारणा झाली.
असा विचार करणारे लोक मनाने कितीही प्रगल्भ असले तरी कशातच सामील व्हायचे नाहीत, साद-प्रतिसाद कसले देणार, असा सारांश. हा खरा/योग्य आहे असा दावा नाही, फक्त एक प्रातिनिधिक विचार - एक मनोवृत्ती सांगितली.
(वरील सर्व फार पूर्वीचे, लग्न होण्याआधीचे. नंतर काय झाले त्याची चर्चा या सार्वजनिक ठिकाणी नको.)

दिगम्भा