नितिन राव,
असं प्रक्षोभक बोलणं आणि जमावाच्या मानसिकतेमधे हिंसाचार घडवणं हीच आता दलीतांची मुर्दुमकीची लक्षणे राहीली आहेत का?
जे चुकीचं घडलंना त्याच्या न्यायाच्या मागणीसाठी चुकीच केली ना?
असा हिंसाचार कधीची वाईटच. यात जांचं नुकसान होतं ना, त्यांचा तुमच्या कुठल्याही मतांशी वैर नसतं अथवा अनुनय नसतो. मग त्यांना होणारा त्रास समर्थनीय कसा?
ही तर बहुसंख्य जमावाची रानटी मानसिकता. खैरांजलीत जे बहुसंख्य ते तेथे रानटी वागले. आणि नागपुर यवतमाळात जे जेथे बहुसंख्य आहेत, ते तेथे त्याचा 'बदला' रानटीपणाने काढणार.
... आणि म्हणे यांना संविधानावर श्रद्धा आहे !
नीलकांत