पूर्वी दूरदर्शनवर दर रविवारी प्रादेशिक भाषांमधील पुरस्कारप्राप्त आणि दर्जेदार चित्रपट दाखवले जात असत. हा उपक्रम फार छान होता. त्यांना subtitles असल्याने भाषेचा पण प्रश्न येत नसे. सत्यजित रे, मृणाल सेन यांच्यासारख्यांचे काही चित्रपट भाषेची अडचण न येता बघायला मिळाले. 'सूर्योदय' नावाचा एक चांगला मराठी चित्रपट सुद्धा यात पाहिला होता (दीप्ती नवल नायिका, नायक आठवत नाही, बहुधा नाना पाटेकर) असे आठवते.
(कार्यालयातील सहकारी सोमवारी जेव्हा सांगत की मॅडम, कालचा मराठी चित्रपट खूप छान होता तेव्हा बरे वाटत असे!)