कालचे वादे फुलांनी पाळले होते
हात माझे मोगर्‍याने जाळले होते!
ह्यात वरची ओळ मला कमकुवत आणि भरतीची वाटली. वर फुले आली आहेत. खाली पुन्हा एक पुष्पविशेष. म्हणून सुचवले. बाकी काही नाही.

भेटणे झाले कसे ते सांत्वनासाठी!
तू अबोलीच्या फुलांना माळले होते!
अबोलींच्या फुलांना माळणे अधिक सूक्ष्म आणि सूचक वाटते. तू मला  भेटायली  आलीस तेव्हा अबोलीच्या  फुलाच्या श्रृंगार केला होतास. म्हणजे ह्या अबोलीमुळे तुला भेटण्यासाठी अधीर होतीस पण  भेटूनही  भेटणे झाले नाही.

ते कसे गोंजारणे होते गुलाबाचे?
पाकळ्यांनी अंग हे रक्ताळले होते!
काट्यांनी रक्ताळणे काही नवीन नाही. पण पाकळ्यांनी रक्ताळावे?

असो. तुमचे काही चुकले नाही. पसंद अपनी अपनी, ख़याल अपना अपना. हे माझे केवळ मत.