नीलकांत,
अनिल अवचटांचा तो लेख बहुधा "धार्मिक" नावाच्या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट आहे असे वाटते. (चू.भू.दे.घे.). माझ्याकडे आता संदर्भ तात्काळ उपलब्ध नाही. मिळाल्यावर तुम्हाला नक्की कळवतो. अवचटांच्या अंधश्रद्धाविषयक पुस्तकांची अनुक्रमणिका चाळल्यास तो लेख आपणास तात्काळ मिळेल.
पुण्यातील बहुतेक दुकानांत अवचटांची सगळी पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध असतात. शोधण्यास तुम्हाला फारशी अडचण येणार नाही.
अनिल अवचटांशी विश्रांतवाडी-येरवडा येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात संपर्क साधता येईल
मुक्तांगण पत्ता: मोहनवाडी, आळंदी रस्ता, येरवडा पुणे ४११००६, फोन नं. २६६९७६०५ muktangan@vsnl.net
अवचटांचा इ-मेल संपर्क पत्ता awachat@aarogya.com