ऑस्ट्रेलियन खेळाडू उद्धट वागण्याबद्दल प्रसिद्धच(?) आहेत. केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आदरणीय असलेल्या शरद पवारांचा त्यांनी अपमान केला यात आश्चर्य ते काय?

एखाद्या बक्षिससमारंभाला प्रमुख पाहुणा ठरवताना ज्यांचा गौरव करावयाचा असतो त्यांना त्या पाहुण्याबद्दल आदर वाटण्यासारखे त्याचे कर्तृत्व असायला हवे असे मला वाटते. यावर आपले मत काय आहे

मला वाटते येथे बीसीसीआय चे अध्यक्ष हे पद आदर दाखवण्यासाठी पुरेसे आहे. शरद पवार यांच्या राजकारणाबद्दल कितीही मतांतरे असली तरी बीसीसीआय व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने त्यांना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आदर दाखवणे क्रमप्राप्तच होते.

ज्यांचा गौरव करावयाचा आहे त्यांना पदाने व वयाने मोठ्या व्यक्तींचा आदर करणे यासारख्या मूलभूत संस्कारांचे ज्ञान असणे आवश्यकच आहे.

प्रमुख पाहुणा निवडण्याआधी ज्यांचा गौरव करायचा आहे त्यांच्याकडून "ना हरकत प्रमाणपत्र" लिहून घ्यावे असे आपणास वाटते का?