जागतिक आणि अगतिक असे शब्द आहेत.
व्यंजनसाधर्म्य साधण्यासाठीचा खटाटोप होता का?
फक्त त्यांचा या लेखात जरा "पर्याय नाही" हा जो सूर आहे तो जरा खटकला.
खटकला? अहो जिव्हारी लागला!
असो, साधूंनी नांगी टाकली आहे... मनोगतींनी नसावी....?
आम्ही इथे जिवाचं रान करून शब्द शब्द लढवायचा आणि तिथे ते शस्त्र टाकून गुडघ्यावर उभे! मराठ्यांत कोणी शेलारमामा उरला नाही का??
म्हणूनच साधूंना सांगावेसे वाटते की आपण नवीन शब्दांचे स्वागत नक्कीच करू, पण जागतीक होण्यासाठी जर मराठी-इच्छाशक्ती दुर्बळ असली तर नवीन शब्द नुसतच "उसनं अवसान" ठरतील!
लाखमोलाची बात! डोळे झाकून ठेवलेली श्रद्धा आणि अर्थ/उच्चार न जाणता वापरलेले शब्द मी एकाच तागडीत तोलतो. दोन्हीही हानिकारकच.