जोडाक्षर आल्यास आधीच्या अक्षर दीर्घ घेण्याचा नियम माहिती आहे, त्याची उजळणी केल्याबद्दल आभार. (क्ष चा उच्चार शेर वाचताना दीर्घ झाला म्हणून तो गुरू घ्यायचा का एवढा विचार मनात आला)

मक्त्याचा आम्हाला जाणवलेला अर्थ सांगितला. सर्व शेरात विरोधाभास आहेत असे वाटले त्यानुसार अर्थ लावला.
पारिजाताचे झाड स्वर्गातही आढळते... (स्वर्गात फक्त तीन झाडे आहेत अशी आख्यायिका वाचली असावीत, त्यापैकी एक पारिजात) आणि त्या शेरातला नायकही तिथलाच (गंधर्व?!) त्यामुळेच पारिजाताने त्याला सांभाळले होते,
>> हे सर्व पटते.

पारिजात पृथ्वीवरही असल्याने ह्या शेराचा अर्थ रूपकात्मक सुद्धा घेता येतो. पारिजातक मुळात एक शापित झाड आहे, त्याची शक्ती कल्पवृक्षापेक्षा कमीच.  त्यामुळे आपल्याला अभिप्रेत अर्थ कल्पवृक्षाने सांभाळले होते असे केले तर अधिक स्पष्ट होईल. "असा येथे" चा अर्थ लावण्यास सोपे जाईल.
चू. भू. द्या. घ्या.