मराठी भाषकांनी बहुभाषी व्हावे हा विचार मला तरी नवा वाटत नाही. कारण इतिहास काळात दुसऱ्या राजाच्या दरबारात वकील म्हणून काम करण्यासाठी ती एक महत्त्वाची पात्रता मानली जात असे. स्वतःचे राज्य स्थापन करणारे शिवरायांचे वडील शहाजी राजे संस्कृत, फारसी, कानडी, तेलगू इ. भाषांचे जाणकार होते. अशी अजून कितीतरी उदाहरणे देता येतील. मात्र माझी एक अपेक्षा आहे, मराठी माणसाने बहुभाषी होताना मराठीच्या 'ण'ळातून पा'नी' येणार नाही याचीही काळजी घ्यावी. अन्यथा स्वतःचीच भाषा नीट येत नाही, हा कमीपणा इतर भाषकांकडून समजून घ्यावा लागायचा.

अवधूत.