एवढी काळजी घेऊन एखाद्याचा लेख, कथा, इ. (संग्राहक म्हणून आपल्या नावाचा उल्लेख केल्यास चालेल) मनोगतवर प्रसिद्ध केल्यास प्रताधिकार (किंवा स्वामित्व हक्क ) कायद्याचा भंग होईल असे मला वाटत नाही.
केवळ एवढीशी गोष्ट पाळली तर ती पुरेशी ठरेल काय?
लेखक, प्रकाशक यांची परवानगी आवश्यक नाही का?
एखाद्या लेखकाचे साहित्य प्रताधिकार आणि स्वामित्वहक्क कायद्यातून केव्हा मुक्त होते?
काही वर्षांपूर्वी गु. रवींद्रनाथ टागोर यांचे बरेचसे साहित्य प्रताधिकार आणि स्वामित्वहक्क कायद्यातून मुक्त झाले असे वाचल्याचे पुसटसे आठवते.
हे होते म्हणजे नक्की काय होते? असे करण्यासाठी काय करतात?