मेलबोर्न, ता. ८ - चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस समारंभात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या वर्तनाबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग याने आज माफी मागण्याची तयारी दर्शविली. भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पॉंटिंगसह त्याच्या सहाकाऱ्यांनी केलेल्या उद्धट वर्तनामुळे भारतात ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध संतापाची लाट पसरली आहे.
पॉंटिंग म्हणाला, चॅम्पियन्स चषक हातात घेण्यासाठी आम्ही सारेच खूप उत्सूक होतो. त्यातून काही घडले असेल आणि कोणी दुखावले गेले असेल, तर माफी मागण्याची माझी तयारी आहे. कोणाचा अवमान करण्याचा आमचा अजिबात उद्देश नव्हता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्यावतीने काही करण्याची आवश्यकता असेल, तर मी ते जरूर करीन.