पुण्यातल्या कंडक्टरांबद्दल काय बोलावे !
एक अनुभव सांगतो. १३ क्रमांकाची बस बिबवेवाडी-स्वारगेट-शनीपार-शनिवारवाडा अशी जाते. एक निरक्षर आजी, (पुण्यात नव्या) बिबवेवाडीच्या थांब्यावर कंडक्टराला विचारतात,'का हो, शनिपारला थांबणार का?' त्यावर कंडक्टर महोदय नेहमीच्या गुर्मीत,' शनिवारवाडा आहे!' आजींना मार्ग माहीत नसल्याने त्या पुन्हा,'अहो पण शनिपारला थांबणार का?' कंडक्टर महोदय परत अजून गुर्मीत,' शनिवारवाडा आहेऽऽऽ!' आता बोला ! या माणसाने 'हो' असे एक अक्षराचे उत्तर द्यायचे तर त्याची पद्धत पाहा. शेवटी इतरांनीच मधे पडून 'हो' सांगीतले. महोदय त्यांच्या उत्तरावर अडूनच बसलेले !!
--लिखाळ.