ज्यात ३३ कोटी देवांबद्दल माहिती आहे. त्या पुस्तकानुसार, तुम्ही म्हणल्याप्रमाणे, ३३ 'कोटी' ही संख्या नसून ३३ प्रकार आहेत.
वेळ झाला तर त्यातला उतारा इथे लिहितो पण त्यात अडचणी आहेत : एकतर त्यात बऱ्याच आकृत्या आहेत त्या इथे काढणं अवघड आहे. दुसरं हा विषय तसा मनोगतावर वादग्रस्त आहे. अनेक विज्ञानवादी, विषयांतरवाले धावून येतील आणि मुळ विषय बाजूला राहील. वाद घालायला माझी ना नाही. पण मला स्व:ताला त्याचं पूर्ण आकलन झालेलं नाही अजून लर्नींग प्रोसेस मधे आहे.
मी व्य. नि. मधे तुम्हाला पुस्तकाचं नाव कळवतो. तुम्हाला समजलं तर मला पण सांगा.