दिगम्भाजी,
सुंदर कथा आणि चित्रपट.. तुम्ही लिहिलेली कथा वाचून काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर पाहिलेला हा चित्रपट आठवला.

तुम्ही म्हटल्याप्रमाणे या कथेचा शेवट चाकोरीबाहेरचा; पण वस्तुस्थितीला धरून आहे. त्यामुळेच बहुधा प्रेक्षकांना आवडला नाही.

शंकर-जयकिशनची गाणी तुम्ही लिहिली आहेतच; पण मला 'सजनवा बैरी' हे गाणं सगळ्यात आवडलं होतं - कदाचित, चित्रपट बघताना बाकीची गाणी आधीपासून माहिती होती हे असेल. ते गाणं त्यानंतर आत्तापर्यंत पुन: ऐकायला मिळालं नाही.

कृष्णधवल असूनही उत्तम छायाचित्रण या चित्रपटात पाहायला मिळतं ही अजून एक गोष्ट.

- कुमार