कोणीही यावे आणि एका जबाबदार व्यक्तीला टपली मारून जावे अशी खचितच परिस्थिती नाही. एखादा चषक जिंकला म्हणजे कसेही वागण्याची मुभा मिळत नाही हे त्यांना बजावणे आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलियन संघाच्या वागणुकीचा निषेध करावा तितका थोडाच. शरद पवार यांनी या मुद्द्याचा बाऊ केला नाही हे त्यांचे मोठेपण आहे पण अशा गोष्टी गंभीरपणेच घेतल्या जाव्यात.