एखादी तथाकथित बाब सुचवण्यासाठी एकेरी अवतरणे वापरतात.
तिसऱ्या व्यक्तिचे कथन लिहिण्यासाठी दुहेरी अवतरणे वापरता.
शब्द ठासून सांगण्यासाठी शब्द ठळक करतात, ठळक करण्याची सोय नसेल तर शब्दाभोवती * लिहितात.
हे 'नियम' महाजालावर अनेक दशके आहेत.
उदा. "मी हवेतून रोलेक्सचे घड्याळ काढून दाखवतो" असे त्या भोंदू 'बाबा'ने म्हणताच त्याच्या *समस्त* 'भक्त'गणाने त्याच्यासमोर लोटांगण घातले.