प्रिय भाष,

परखड लिहितोय...या विषयावर. यातली कुठलीही वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेली टीका नाही हे कृपया लक्षात घ्यावं ही विनंती.

यातली मतं सी. एन. एन. (युरोप) वर पाहिलेल्या या निवडणुकांच्या बातम्या दाखवतायत, त्यावर किंवा पूर्वेतिहासावर आधारित आहेत....

मुख्य म्हणजे निकोप आणि मुद्द्यावर तसेच अतिशय सुबद्ध रितीने इथल्या निवडणुका होतात याचे फार कौतुक आणि अभिमान वाटतो.

(१) या बातम्यांवरून ही गोष्ट मला तरी पटली नाही...

उदा. निवडणुकांमधे ज्या भागात (जिल्ह्यात) विरोधी-पक्षाला मतं मिळण्याची शक्यता जास्त आहे, त्या भागांची दर-निवडणुकांना सत्ताधारी पक्ष पुनर्रचना करतो! या वेळी मेक्सिकोतून घुसखोरी हा एक महत्त्वाचा (इराक- युद्धाइतका नसला, तरी) मुद्दा असल्यामुळे सीमेलगतच्या भागांची अशीच पुनर्रचना केली गेली आहे! हे नेहमी होतं आणि न्यायालयंही हे संमत करतात असं त्यावर दाखवलं.
शिवाय रिपब्लिकनांनी केलेले घोटाळे हा एक सी. एन. एन. वर मोठा चर्चेचा विषय झालाय.
त्यामुळे 'निकोप' या शब्दाशी मी सहमत नाही.

(२) पूर्वेतिहास पाहिला, तर बुश आणि अल-गोर यांच्यातल्या निवडणुकांच्या वेळी मला वाटतं निवडणुकांनंतर कित्येक दिवस (सुमारे महिना?) राष्ट्राध्यक्ष नियुक्त व्हायला लागले होते! हे भारतापेक्षा फारसं वेगळं नाही वाटलं.  

(३) बाकी 'इराक' हाच मु:ख्य मुद्दा या निवडणुकांमधे होता आणि तिथे ऑक्टो. २००६ हा अमेरिकेच्या सैन्यासाठी या वर्षातला सर्वांत वाईट महिना होता; बुशची ढासळती लोकप्रियताही इराकमुळेच आहे इ. बातम्या ऐकल्या. डेमोकॅट्स आले, तरी इराक-नीती बदलणार नाही असं वार्ताहरांचं म्हणणं आहे. बाकी आर्थिक-नीती बद्दल तुम्ही म्हणता हे योग्य असावं (मला माहिती नाही).

अमेरिकेत होणाऱ्या बदलाचे जगभर परिणाम होतात हे महत्त्वाचे आहे.
- भारतावर काय परिणाम होतात? असा एक विचार उगाचच मनात आला. गेल्या ५०-६० वर्षांतल्या अमेरिकेतल्या सत्ता-बदलाचे परिणाम भारतावर काय झाले?

- कुमार

 ता. क. अमेरिकेत लोक रस्त्यावर गाड्या जास्त अतिशय सुबद्ध रितीने चालवतात (उदा. आपला आखलेला मार्ग न मोडता, कर्णा न वाजवता) आणि त्याचं कौतुक / अभिमान वाटतो असं म्हटलंत तर ते मान्य!