माकडछापची काळी दंतमजंन असायची काचेच्या बाटलीमधे.
विक्रम वेताळ मालिकेत एका कलाकाराच्या खांद्यावर वेताळ उलटा बसलेला असायचा आणि पांढरे वाढलेले केस, विक्रमाने प्रश्नाचे उत्तर दिले की परत सुळकन जाऊन झाडावर लटकत असे.
विविध भारतीवर सतत गाणी असायची. पण त्या कार्यक्रमाची नावे आता आठवत नाहीत. एक भुलेबिसरे गीत सकाळी ८ ते ८.३० असायचे. शास्त्रीय संगीतावर आधारित १० मिनिटांचा एक कार्यक्रम असायचा. रात्री १० ला छायागीत व ११ ला बेलाके फूल. सकाळी ८.३० ला आप ही के गीत ९ ते ९.३० नविन चित्रपटातील गाणी, दुपारी ११ ते १२ जुनी-नवी गाणी, पण कार्यक्रमाचे नाव आठवत नाही. १२ ते १२.३० मराठी गाणी.
अजून एक कार्यक्रम असायचा विविध भारतीवर शनिवारी दुपारी. त्यामध्ये एकाच गीतकार/संगीतकाराची मुलाखत व अधुन मधून गाणी, पण त्या कार्यक्रमाचे नाव आठवत नाही. कुणाला आठवते का? या सर्व कार्यक्रमाची नावे?