देव हे सर्वशक्तिमान, निर्गुण, निराकार परमेश्वर वगैरे नसून मानव, दानव, वानर, किंनर इत्यादींप्रमाणे देव ही देखील माणसाचीच एक जात (वैज्ञानिक अर्थाने,उत्क्रांतीच्या संदर्भात ... तेही पुरातन काळी अवगत असलेल्या विज्ञानानुसार ) असावी असेही काहींना वाटते. आपल्या देवांच्या कथा वाचल्या तर त्यांच्या आवडीनिवडी, विकार, इच्छा आकांक्षा, त्यांचे वर्तन कित्येक वेळेला माणसासारखेच असल्याचे दिसेल. माणसांनी देवांना युद्धात मदत केल्याच्याही कथा आहेत. (रघु की दिलीप? इ.) उदा. शनीची पीडा नको म्हणून इंद्र झाडाच्या ढोलीत लपून राहिला होता, त्यावर त्याला तसे लपून राहावे लागले हीच शनीची पीडा असा शनीने काढलेला निष्कर्ष आणि त्याच्यावर केलेली कुरघोडी.

त्यामुळे उपासनेचे, भक्ताला पावणारे देव वेगळे आणि हे तेहतीस  कोटी देव वेगळे असावेत, असे वाटते!