... सूतिकागृहात कान गच्च बांधूनही आवाजाने किंचाळणारी आणि थकून केविलवाणेपणाने पडून रहाणारी मुले आणि आधीच निद्रानाशाने छळलेले असताना रात्रीबेरात्रीच्या स्फोटाने अधिक भेदरलेले वृद्ध पाहिले. उडून गेलेल्या लडीत न उडालेले सुट्टे फटाके शोधणारी झोपडपट्टीतली मुले पाहिली, दिवाळीच्या दिवसांतला वाढलेला दारुचा (दोन्ही प्रकारची) खप पाहिला...
संजोप, पुढे तुम्ही म्हणालात 'ते जाऊ द्या'.. पण इथेच अडकायला झालं हो!
दिवाळीत कानठळ्या बसवणारे फटाके उडवलेच पाहिजेत का? परवाच एकांनी याच एक कारण सांगितले. पावसाळ्यात जे कीटक वाढतात ते फटाक्यांच्या धुराने मरतात. पटण्यासारख्रे नाहीच. शिवाय यात फटक्यांच्या आवाजाबद्दल आवाजच नाही. कीटकांना मारण्यासाठी माणसांचे नुकसान कशासाठी? फटाक्यांशिवाय दिवाळी नाही, असे का?
छाया