'माणूस...' ची बलस्थाने यावर 'माणूस..' संपल्यावर चार शब्द लिहावे, असा मानस आहे.
हे वाचायला 'माणूस...' इतकेच आवडेल.

माझ्या सुदैवाने कुमारवयात (१७-१८ व्या वर्षी) मला लायब्ररीत शेख सर नावाचे आमच्या गावातल्या ऊर्दू शाळेतले एक शिक्षक भेटले. तेव्हा मीही सुशि, नासी फडके वगैरेच वाचायचो. शेख सरांनी मला त्यावेळी हातकणंगलेकरांनी संपादित केलेले जीएंचे डोहकाळीमा हे पुस्तक आवर्जून वाचायला दिले होते. त्यावेळी १२वीत असताना आम्हाला जीएंची राणी ही कथा अभ्यासक्रमात होती. या कथेवर शेख सरांनी माझ्यासारख्या अजाणत्या मुलाबरोबर मला समजेल अशी चर्चा करून जीएंचे साहित्य वाचणे हा किती चांगला अनुभव आहे हे समजावले होते.

अर्थात त्यावेळी जीएंच्या बहुतेक कथा खूप मोठ्या असतात, समजत नाही ही तक्रार त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांनी 'कुसुमगुंजा' हा जीएंच्या लघुकथांचा संग्रह सुचवला होता. त्यातील भेट ही कथा आणि त्यातली मधूची आई तर कित्येक दिवस आठवत होती.

शेख सर भेटले नसते तर मीदेखील या साहित्याच्या वाटेला गेलो नसतो असेच वाटते.

रावसाहेब इथेही तुम्ही आमच्या सरांसारखेच काम करत आहात.

तुमचे जितके आभार मानावे तेवढे थोडेच...