रसिकपुस्तके संकेतस्थळ आहे तर छान पण या स्थळावरचा मजकूर यूनिकोडित नसल्यामुळे ह्या स्थळाचा गूगल, याहू इ. सारख्या सर्वसाधारण शोधसाधनांद्वरे शोध करता येत नाही. म्हणून एखाद्या पुस्तकाबद्दल जर माहिती काढायची असली किंवा विकत घ्यायचे असले तर पानन् पानं शोधत बसावी लागतात. जर हे संकेतस्थळ यूनिकोडित करण्यात आलं तर किती फ़ायदा होईल, ग्राहकांचा तर होईलच, पण त्यामुळेअधिक पुस्तके विकली गेल्यामुळे रसिकपुस्तकेवाल्यांचादेखील. मनोगत यूनिकोडित असल्याचा हाच तर मुख्य फ़ायदा मला जाणवतो. उदा.जर कोणाला पोहे बनवण्याची पाकक्रिया हवी असली तर फक्त गूगलवर 'पोहे' हा शब्द शोधण्याची गरज आहे.. हा शोध त्यांना सरळ मनोगतवरच्या रोहिणीच्या पोहे बनवण्याची पाककृती लिहिलेल्या पानावर नेऊन सोडतो (हे पहा). रसिकपुस्तकेवाल्यांनी सुद्धा आपले संकेतस्थळ यूनिकोडित केले तर किती बरं होईल.. खरं तर मराठी बातमीपत्राच्या संकेतस्थळांनीसुद्धा यूनिकोडचा वापर केला तर आपण बातम्यादेखील गूगलवर सरळ मराठीत शोधू शकू..