श्री. जावडेकर,

आपल्या परखड मतांबद्दल धन्यवाद.

  1. अमेरिकेबाहेरच्या लोकांना CNN वरून अमेरिकेची माहिती मिळते आणि त्यावरून मते बनवली जातात हे बहुतांशी खरे आहे.  मात्र CNN हे डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूचे आणि अति-उदारमतवादी आहे याकडे मनातून उदारमतवादी असलेले लोक सोईस्कर दुर्लक्ष करतात.  निःपक्षपाती मत बनविण्यासाठी दोन्ही बाजूंची मते पूर्ण ऐकून घेण्याची सोय आपल्यास असती तर ते मला चर्चेला जास्त आवडले असते.  तरीही इथली निवडणूक निकोप नव्हती असे मत का व्हावे ते समजले नाही.  भागांची पुनर्रचना ही तुम्ही समजता इतकी सोपी नाही.  त्याचे सर्व नियम ठरलेले असतात.  शिवाय तो अधिकार राज्यसरकारचा असतो.  तसेच ही पुनर्रचना ही लोकसंख्येच्या स्थित्यंतराला अनुसरून असते.  प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी किती हे पहिल्यापासून निश्चित अहे.  त्या राज्याची लोकसंख्या तेव्हढ्या भागात साधारण समान वाटप होईल असे ते विभाग असतात.  काही कारणाने जर त्या राज्याच्या लोकसंख्येचे प्रमाण विशेष बदलले तर ते समान करण्याच्या उद्देशाने त्या राज्याचे शासन पाऊले उचलते.  हे करताना पूर्ण जाहिररित्या सर्व प्रकरणाची ठरविलेल्या पद्धतीने सुनावणी होऊन न्यायालयातर्फे ही पुनर्रचना बदलली जाते.  तेव्हा त्यात तुम्हाला वावगं काय वाटलं ते कळलं नाही.
  2. इथल्या निवडणुकीच्या वेळापत्रकाप्रमाणेच निवडणुका होतात.  त्यांत नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी निवडणुका आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सत्ताग्रहण हे ठरलेले आहे.  त्यात सुद्धा आधी संसद आणि मग ती संसद अध्यक्ष निवडते.  त्या अनुसार बुश यांचे सत्ताग्रहण झाले.  त्यात ती निवड पक्की झाली नाही याचा संबंध नव्हता.  किंबहुना असे प्रकार होण्याची शक्यता आहे हे जाणून आणि धोरणाने १७७८ मध्ये प्रस्थापित घटनेने तशी पूर्ण तरतूद केली आहे.  गेले २३० वर्षे सतत त्याच पद्धतीने अगदी नियमित निवडणुका घेणाऱ्या देशाचे कौतुक न वाटणे हे माझ्यामते मनाच्या कोतेपणाचे लक्षण आहे.  अशा देशाचा नागरीक म्हणून मला अर्थातच अभिमान वाटतो ही तितकीच खरी गोष्ट आहे.
  3. इराक आणि सैन्याची प्राणहानी या मुद्द्यामुळेच रिपब्लिक पक्षाला अपयश आले हे खरे आहे.  डेमॉक्रॅटिक पक्षाच्या विजयाने त्यात निश्चितच फरक पडणार.  इतके दिवस त्यांचा विरोध बहुमताभावी निष्फल होता.  आता बुशवर मोठेच बंधन आले आहे.  मुख्य म्हणजे तेथील सैन्य काढून घ्यायचा मोठा दबाव पडेल आणि त्याचे वेळापत्रक मान्य करावे लागेल.

 ता. क. अमेरिकेत लोक रस्त्यावर गाड्या जास्त अतिशय सुबद्ध रितीने चालवतात (उदा. आपला आखलेला मार्ग न मोडता, कर्णा न वाजवता) आणि त्याचं कौतुक / अभिमान वाटतो असं म्हटलंत तर ते मान्य! 

खरे तर सर्वच व्यवहारात सुबद्ध आणि शिस्तबद्ध आहेत म्हणूनच निवडणुका सुद्धा सुबद्ध झाल्या हे लक्षात घ्या.  आर्थिक सुबत्ता हे पण दुसरे कारण आहे.  पण ही सुबत्ता तरी आली कशी?  १९७६ साली अमेरिका (USA) जन्मास आली त्याच वेळेला या नव्या जगात मेक्सिको, ब्रझिल, अर्जेंटिना, चिली अशीही राष्ट्रे होती, परंतु अमेरिका आणि कॅनडा सोडल्यास बाकी आर्थिकरित्या अप्रगत राहिली.  इंग्रजांचा लोकशाही आणि भांडवलशाहीचा वारसा आणि शिस्तबद्धता हे त्याला मुख्य कारण होते याचा डोळसपणे विचार केला पाहिजे.  (ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड यांचा पण विचार व्हावा)

भारतालासुद्धा ब्रिटिशांकडून या गोष्टी मिळाल्या परंतु भारतियाची सरंजामशाही, जातीभेद, एकसंघत्वाचा अभाव आणि शिस्तविरोधी मनोवृत्ती यामुळे त्याचा पुरेपूर फायदा आपण घेऊ शकलो नाही.  तरीही भारत हा इतर मांडलिक देशांपेक्षा जास्त चांगल्या स्थितीत आहे आणि त्याबद्दल अभिमान वाटायला पाहिजे.  खेद आहे की पहिल्या रांगेत उभा राहण्याची क्षमता असून वरील कारणाने ते होऊ शकले नाही.

असो हे बरेच विषयांतर झाले.

आपल्या मतांचा मी आदरच करतो.

कलोअ,
सुभाष