३३ कोटी देव हे थोतांड आहे हे आपण आधीच ठरवून मोकळे झालेले आहोत
नाही असं मला तरी वाटत नाही, आणि मला खात्री आहे की इतर काही जणांनाही तसे वाटत नसेल हे नक्की. अपुरे ज्ञान थोतांड नसते; पण ज्यांना ते तसे मानायचे त्यांना ते मानू दे. त्यांची पर्वा का? तुम्ही जसा वेळ मिळेल तसा संदर्भ इथेच लिहित गेलात तर तो इतरांनाही वाचता येईल.
मी माझे संदर्भ प.वि. वर्तकांच्या वास्तव रामायणातून दिलेले आहेत. वर्तकांचं सगळंच म्हणणं मला पटतं असं नाही म्हणून त्यांनी दिलेले हे वरील संदर्भ खोटे नाहीत. भागवत, रामायण व महाभारतातून मी तपासून पाहिले आहेत. तेव्हा तुम्ही द्यायचं काम केलंत तर उत्तमच आहे. ज्यांना विश्वास ठेवायचा ते ठेवतील, नाही ठेवायचा ते नाही ठेवणार.