मुख्य म्हणजे निकोप आणि मुद्द्यावर तसेच अतिशय सुबद्ध रितीने इथल्या निवडणुका होतात याचे फार कौतुक आणि अभिमान वाटतो

नुकतीच एच.बी.ओ. वरती हॅकिंग डेमॉक्रसी नावाची डॉक्युमेंट्री दाखवली जातेय. मला अजून संपुर्ण पाहण्याचा योग आला नसला तरी इथल्या निवडणुकांमध्ये चालणारा गैर व्यवहार त्यात दाखवला आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन्स मधल्या त्रुटी तर इथल्या सीएनएन वर पण सारखे दाखवत होते.

बुश आणि रिपब्लिकनांची ही पीछेहाट इस्लामी अतिरेक्यांच्या पथ्यावर पडेल असे वाटते

हे विधान मात्र पुर्ण हास्यास्पद वाटते. रिपब्लिकन नेत्यांनी लोकांना मूर्ख बनवण्याचा हा प्रयत्न आहे. नुकतेच एका टीव्ही शो वरती एका प्रोफेसरचे मत ऐकले ते असे, 'कोणत्याही अमेरिकन नागरिकाची अतिरेकी हल्ल्यात मृत्यू होण्याची संभावना (ऑड्स) ही अंतरीक्षातुन एखादा ऍस्टेरॉइड आपटून होण्या इतकीच आहे'. असे असताना इराकसाख्या देशामध्ये उधळली जाणारी संपत्ती (दर मिनिटाला १,००,००० डॉलर्स) कसले संरक्षण देत आहे?

अतिरेक्यांपासून धोका असेल तर तो सर्वात जास्त रिपब्लिकन राजवटीतच आहे कारण ज्या ओसामाने ११ सप्टेंबर घडवले त्याला जिवंत सोडून हे लोक दुसऱ्याच देशांमध्ये अमेरिका द्वेष वाढीस घालत आहेत.

थोडक्यात ह्या निवडणुकांचा कौल हेच दाखवत आहे की अमेरिकन नागरिकांनी आता मूर्ख बनण्याचे नाकारले आहे.

अर्थव्यवहाराला जरा खीळ बसेल असे वाटते.अर्थव्यवहाराला जरा खीळ बसेल असे वाटते

बुश राजवटीमध्ये अमेरिकेचे कर्ज दुप्पट झाले आहे हे विसरू नये.

- वरुण