ज्यांचा गौरव करावयाचा आहे त्यांना पदाने व वयाने मोठ्या व्यक्तींचा आदर करणे यासारख्या मूलभूत संस्कारांचे ज्ञान असणे आवश्यकच आहे.
पदाने मोठ्या व्यक्तिचा आदर करणे गरजेचे आहे, धोरणीपणाचेही आहे. पण एखाद्याचा केवळ वयाने मोठा आहे म्हणून आदर करणे हे नेहमी बरोबरच असेल असे नाही. असे अनेक म्हातारे (मी सुद्धा कदाचित!) असतात ज्यांची कर्तृत्त्वाच्या नावाने बोंब असते व निव्वळ पांढरे केस आणी पडलेले दात यांच्या जोरावर ते स्वतःला 'मोठे' समजतात.
अश्या उपटसुंभांना त्यांची जागा दाखवणे हेच ईष्ट.
शिवाय, हा 'मूलभूत संस्कार' फक्त भारतीय संस्कृतीत दिसुन येतो. इतर संस्कृतीत वाढलेल्यांवर तो का लादावा? त्यांनी त्यांच्या संस्कृतीतील पद्धती दुसऱ्यांवर लादल्या तर तेही बरे नाही.