पराठ्याची कणीक भिजवताना नेहमीपेक्षा थोडे तेल व मीठ जास्त घालून थोडी घट्ट भिजवावी. २ तास मूरू द्यावी. पोळी लाटताना आधी थोडे लाटून त्यावर तेल लावून गोल घडी घालणे. नंतर पीठ लावून अजून थोडी लाटून परत तेल लावून त्याची त्रिकोणी घडी घालणे. नंतर नेहमीप्रमाणे गोल अथवा त्रिकोणी पण ही पोळी थोडी जाड लाटणे. मध्यम आचेवर भाजताना वरून १-२ चमचा तेल सोडणे. म्हणजे पोळी थोडी उलटली की १-२ चमचे तेल सोडणे, परत उलटून परत १-२ चमचे तेल सोडून कालथ्याने दाबून पोळी भाजणे. म्हणजे सगळीकडून भाजली जाईल. हा पराठा खरपूस भाजणे. व गरम पराठ्याबरोबर दही व आंब्याचे लोणचे खाणे. हा पराठा नुसता खायला पण छान लागतो.