अमेरिकन निवडणूक:

  1. एखादी पोटनिवडणूक सोडल्यास स्थानीक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत "इलेक्शन डे" हा नोव्हेंबरचा पहीला मंगळवारच, सत्ता चालू करायचा दिवस जानेवारीतील पहीला/दुसरा सोमवारच (वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे - स्थानिक पासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत) ठरलेले. - हे मला आवडते
  2. दक्षिणी राज्यातला (मला वाटते की द/उ कॅरोलीना की लुईझियाना) एक जुना गव्हर्नर म्हणाला होता की जो पर्यंत मला माझ्या राज्यात पुरले जाईल तो पर्यंत मी निवडणूक लढवू शकीन - अर्थात मेल्यानंतरही माझे मतपत्रिकेवर नाव राहू शकेल! - तेंव्हा इथेपण भ्रष्टाचार होतो.
  3. यावेळेस पण व्हर्जिनियात वगैरे दमदाटीचे फोन करून मतदारांना थांबवायचा प्रयत्न झाला. आता त्याच निवडणूकीवर सिनेटचे भवितव्य अवलंबून आहे.
  4. वर एका प्रतिक्रीयेत म्हणल्याप्रमाणे - सि एन एन हे काही डेमोक्रॅटीक पक्षाशी जवळ नाही उलटे ते जास्त रिपब्लिकनच आहेत. बुशची धोरणेच इतकी भन्नाट ठरली की कुठल्याही शहाण्या रिपब्लिकनला त्याची बाजू घेणे जड झाले आहे.
  5. भारताच्या दृष्टीने रिपब्लिकन्स हे आऊट्सोअर्सिंगसाठी चांगले आहेत. ती धोरणे क्लिंटन असतानाच चालू झाली होती.  आता डेमोक्रॅट काँग्रेसपण  त्यात काही बदल करतील असे वाटत नाही.  पर्यावरण हा भाग गेल्या सहा वर्षात पूर्णपणे दुर्लक्षीला होता. आता लक्ष दिले जाईल.

काही अमेरिकेच्या दृष्टिने या निवडणूकीतील ऐतिहासीक घटना आणि भारताशी साधर्म्य/भेद:

  1. काँग्रेसची सभापती ही प्रथमच स्त्री होणार आहे. हे पद राष्ट्राध्यक्षापासूनचे  तिसरे पद आणि कुठली धोरणे आणि कायदे करायचे हे ठरवणारे पद. जर काहीही कारणाने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष त्या पदावर नसले तर सभापती पदसिद्ध अध्यक्ष होतो/ते.
  2. मॅसेच्युसेटसच्या गव्हर्नरपदी (आपल्याकडील मुख्यमंत्री पण सरळ मतदानाने जनतेने निवडलेला) - प्रथमच एक कृष्णवर्णिय निवडून आला आहे. हा संपूर्ण अमेरिकेतील गव्हर्नरपदी असलेला आत्तापर्यंतचा फक्त दुसरा कृष्णवर्णीय आहे.
  3. भारताचा वरील दोन गोष्टींशी विचार केला तर लक्षात येते की आपल्याकडे स्त्रीयांना मोठी पदे सहज मिळाली आहेत. कृष्णवर्णीय नसतील पण दलीतांना मुख्यमंत्री होता आले आहे.

सर्वात महत्त्वाचे:

बहुसंख्य हिंदूंच्या देशात एक मुसलमान राष्ट्रपती, कॅथॉलीक स्त्री पक्षाध्यक्ष आणि तिच्या पक्षातील शिख पंतप्रधान (मी शिखांना हिंदूच समजतो, पण बरेचजण समजत नाहीत) निवडून येऊन राज्य करू शकतात आणि लोकांना आवडू शकतात. हे बाकी "सिस्टीम" म्हणून कितीही कमी असलो, मतदानाच्या बाबतीत कितीही चुका (पुर्वी जास्त आता कमी) झाल्या/होत असतील, तरी केवळ भारतातच शक्या आहे. अमेरीकेत हे मान्य होयला अजून किमान अर्ध शतक लागेल. युरोपमधे तर काय साधी स्टील इंडस्त्री कायद्यानुसार घेत असूनपण लक्ष्मी मित्तलला विरोध झाला जो एखाद्या त्या क्षेत्रातील अमेरिकन बिल गेट्सला झाला नसता...

तात्पर्य: उडदामाजी काळे गोरे सगळीकडेच असतात. आपण काही (चांगल्या आणि वाईट अर्थाने) कमी नाही की अमेरिकन्स (आपल्यापेक्षा) जास्त नाहीत! मात्र इतकेही खरे की संपूर्णजगात मला भारतानंतर तेव्ह्ढ्याच स्वातंत्र्याने एक नागरिक म्हणून अमेरिकाच जवळचा वाटते.