प्रसाद,
गझल नेहमीप्रमाणे झकास! पण 'लहान तोंडी मोठा घास' घेण्याचा धोका पत्करून फक्त एक सुचवणी करतोय.
मोजलेस तू मनात आकडे किती
अर्थ शून्य व्हायचाच आज ना उद्या
-- वरच्या ओळीतील 'आकडे' व खालच्या ओळीतील 'अर्थ शून्य होणे' किंचित विसंगत वाटते. आकड्यांना संख्यात्मक 'मोल' असते. त्यांना शब्दाप्रमाणे 'अर्थ' नसतो. त्यामुळे त्यांचे मोल/किंमत 'शून्य' होऊ शकते, अर्थ नाही.
पण 'आज ना उद्या तू अर्थशून्य (कफल्लक) व्हायचाच' असा अर्थ अपेक्षित असेल तर मग 'अर्थ शून्य' ऐवजी 'अर्थशून्य' असे लिहावे लागेल.
उत्तरादाखल तुझे विचार कळव.
जयन्ता५२