बुश आणि रिपब्लिकनांची ही पीछेहाट इस्लामी अतिरेक्यांच्या पथ्यावर पडेल असे वाटते.
कसे काय? किंबहुना बुशच्या इराकी आक्रमणामुळे इस्लामी कट्टरपंथीयांना नवे रंगरूट फारसे प्रयत्न न करता मिळत आहेत. माद्रिद आणि लंडन येथील अतिरेकी हल्ले हे ९/११ नंतरच झाले.
मुख्य म्हणजे निकोप आणि मुद्द्यावर तसेच अतिशय सुबद्ध रितीने इथल्या निवडणुका होतात याचे फार कौतुक आणि अभिमान वाटतो.
अमेरिकेतील निवडणुका निकोप होतात हा एक भ्रम आहे असे वाटते. तिथल्या निवडणूक जाहिरातींतून चिखलफेक होत नाही काय? किंबहुना बुशच्या आगमनानंतर, विशेषतः इराकी आक्रमणानंतर, अमेरिकेतले राजकीय वातावरण अत्यंत 'पार्टिज़ॅन' झाले आहे, असे एकंदर तिथल्या राजकीय चर्चा, घडामोडी बघितल्यावर कुण्याही दूधखुळ्या मुलाला कळू शकेल.
चित्तरंजन