प्रकाशनाचा महिना ऑगस्ट १९५९ असा दिला आहे. म्हणजे अद्याप कॉपीराईट संपायला अडीचेक वर्षांचा अवधी आहे!
वैयक्तीक निर्मीतीवरचा प्रतहक्क हा मूळ निर्मात्याच्या मृत्यूनंतर ५० वर्षे (निदान भारतात) अबाधित असतो. त्यामुळे आपले वरील विधान खरे नाही.
दुसरे असे की "हिरवे रावे" अजुनही छापले जाते त्यामुळे "आऊट ऑफ प्रिंट" आहे म्हणून प्रतहक्क डावलला असेही म्हणता येणार नाही. अर्थात हा बचाव नेहमीच कायदेशीररित्या मान्य होतो असे नाही.
(ग-म-भ-न बंद पडला आहे, तेव्हा अनवधानाने झालेल्या शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल क्षमा असावी.)
आपला (वकील नसलेला) इहलोकी.