देव हे सर्वशक्तिमान, निर्गुण, निराकार परमेश्वर वगैरे नसून मानव, दानव,
वानर, किंनर इत्यादींप्रमाणे देव ही देखील माणसाचीच एक जात (वैज्ञानिक
अर्थाने,उत्क्रांतीच्या संदर्भात ... तेही पुरातन काळी अवगत असलेल्या
विज्ञानानुसार ) असावी असेही काहींना वाटते.
तुम्ही म्हणता ते अगदी पटण्यासारखे आहे. पण तेहेतीस हीच संख्या का? एकशे पाच कोटी किंवा शेहेचाळीस का नाही? त्याकाळी भारताची लोकसंख्या तेहेतीस कोटी नसावी, असा माझा अंदाज. त्यातील देवांची संख्या तेहेतीस असेल असे वाटते.
चित्तरंजन
अवांतर:
'तेहतीस', 'तेहत्तीस' ही दोन्ही रूपेदेखील योग्य आहेत काय? माझ्या मते नसावीत.