प्रताधिकार आणि स्वामित्वहक्क कायद्याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल काय?

महाजालावर बऱ्याच ठिकाणी अशी माहिती उपलब्ध आहे.

अद्याप प्रताधिकाराच्या बंधनात असलेले साहित्य मनोगत सारख्या ठिकाणी प्रसिद्ध केले तर कारवाई होऊ शकते का?

कारवाई होऊ शकते. पण अशी कारवाई प्रतहक्क धारकाने सुरू करावी लागते. उदा. प्रकाशकांकडून अशी कारवाई होऊ शकते.

पन्नास वर्षांपूर्वी प्रथम प्रकाशित झालेली पुस्तके जबाबदार व्यक्तीच्या परवानगीशिवाय इतरत्र प्रसिद्ध करू शकतो का?


मुळात प्रकाशनापासुन ५० वर्षांचा मुद्दा चुकीचा आहे. वैयक्तीक निर्मीतीचा प्रतहक्क हा निर्मात्याच्या मृत्यूनंतर ५० वर्षे अबाधित राहतो. त्यामुळे वरील प्रश्न उद्भवत नाही. एखाद्या संस्थेतर्फे जर निर्मीती झाली असेल तर प्रतहक्क प्रथम प्रकाशनानंतर ५० वर्षे अबाधित राहतो.

हा कालावधी संपला की अशी निर्मीती "पब्लीक डोमेन" (प्रतिशब्द?) मध्ये गणली जाते. मग त्यावर कोणाचाही प्रतहक्क असत नाही. अशा निर्मीतीच्या पुनःप्रकाशनासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही.

वेळ मिळाल्यास एकंदरच बौद्धिक मालकी हक्कांबद्दल (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स), उदाहरणार्थ प्रतहक्क किंवा "पेटंट्स" (प्रतिशब्द?) माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

मी वकील नाही, पण याविषयाचे कामानिमीत्तने शिक्षण घेतले आहे.

आपला (बौद्धिक दिवाळखोर) इहलोकी.