जुन्या मराठीत असे कितितरी शब्दांचे होत असे,
जसे
साता समुद्रांपलीकडे
साठा उत्तराची कहाणी
तसेच हे फारा वर्षांपूर्वी
विशेष्याबरोबर (म्ह. ज्याचे वर्णन केले आहे ते) विशेषणाचे (वर्णन करणारा शब्द) रूप बदलणे हे नवीन नाही
गोड्या पाण्यातील
काळ्या कुत्र्याला
फरक एवढाच की पूर्वीच्या भाषेत हे शब्द जसे रूप बदलायचे तसे हल्लीच्या भाषेत होत नाही.
याच प्रकारे पूर्वी रामाला. सीतेला असे म्हणायचे तर आता अशोकला, मीनाला असे म्हणतात.
सो। अशा प्रकारची रूपे पूर्वीचे कायदेशीर दस्तऐवज पाहिलेत तर आणखीही मिळतील. एखादी बखर पहा त्यातही हा प्रकार दिसेल. या क्षणी तपशील आठवत नाही पण अशी खूप उदाहरणे आहेत. मु।, खु| असे काहीतरी वाचल्याचे स्मरते.