इतर भाषांना आपलसं केल्याने आपण आपली भाषा देखील तितकीच समृद्ध करु शकतो हे अगदी खरे आहे. कारण ती भाषा शिकण्यासाठी आपण आपल्या मनात आपल्या भाषेतूनच विचार करणार असतो.

आमच्याकडे एक आजोबा यायचे त्यांना भारतातल्या प्रत्येक मुख्य भाषेतील 3 ते 4 समपर्क वाक्य आणि ' आभारी आहे.' हे वाक्य बोलता यायचं. नोकरी निमित्त जिथे जिथे जायची वेळ यायची तिथली स्थानिक भाषा ते काही दिवसातच शिकायचे आणि लोकांना आपलसं करायचे. लहान सहान वाक्य स्थानिक भाषेतून बोलल्यामुळे त्यांचा लौकीक फार चांगला होता. आपल्या मातृभाषेसह इतर कोणत्याही एका भाषेवर प्रभुत्व असणे ही खरोखरच चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे.