मीराताई, जीजिसा, नंदन, मृदुलादेवी, कुमार, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
छायाताई, "पंचलाइट" ची आठवण करून देऊन त्या कथेबद्दल काही लिहायची संधी दिल्याबद्दल आभार.
संजोपराव व सुभाषराव यांच्या विषयी काय बोलायचे? सगळेच मनोगती कदरदान आहेतच, पण हे दोघे त्याच्या पुढचे ज़र्रा-नवाज़ निघाले. आणि कुमार-वसंतराव ही तुलना वाचून माझ्यावरच लाजायची पाळी आली.
(तसे ठीकच आहे, मीही हे शब्दालंकार फार वजनदारपणे घेत नाही म्हणा)
मिलिंद, आता "सर्किट" हे नाव बदलून "गुणग्राहक" हे नाव धारण करावे अशी सूचना करतो.
विनायकराव, तुमच्या मतात तथ्य आहे. तो चित्रपट संपूर्ण निर्दोष आहे असे मलाही वाटत नाही. पण कोणतीही वस्तू, व्यक्ती, एकदा आवडली की तिचे दोष दिसेनासे होतात तसे आमचे सर्वांचे झाले आहे. शिवाय गाण्यांचे संगीत व शब्द वेगवेगळे काढून त्यांचे मूल्यमापन करणे सगळ्यानाच जमेल असे नाही. इथेही तेच, सामान्य लोकाना गाणे आवडले की पूर्ण आवडते अगदी शब्द निरर्थक असले तरी (हल्लीच्या काळात याचा जऽऽरा जास्तच प्रत्यय येऊ लागला आहे, बुवा!).
वेदश्री म्हणजे भरभरून प्रतिसाद अशी आता व्याख्या करायला हरकत नाही. इथे आभाराचे शिष्टाचार नकोत. आणि हे काय? आमची कोल्हापुरी भाषा अशी सगळ्यांना कशी समजायला लागली?
असो. अपेक्षेपेक्षा खूपच जास्त कौतुक केले सर्वांनी, पुन्हा आभार.
दिगम्भा