तसे बघितले तर माझे या विषयावर काहीच मत नाही. लग्नातील, व इतर समारंभांतीलही अनेक रूढी कालबाह्य झाल्या आहेत, नवनवीन तयार होत आहेत.
चर्चा प्रस्ताव वाचून पडलेला प्रश्न: रुखवतातील घटक पदार्थ करून देण्याची जबाबदारी केवळ स्त्रीवर्गाची आहे असे दिसते आहे. आठवण म्हणून एकेक वस्तू करून घ्यावी असे म्हटले तर मग आजोबा, काका, मामा या लोकांची आठवण का नको? तसेच मुलगा आणि मुलगी दोघे नव्या घरी राहायला जातात तर मग मुलाच्या नातेवाईकांची आठवण का नको?